हे मजुर माणसा...
हे मजुर माणसा...


हे मजुर माणसा
चाललास तु परत गावी
म्हणुनी खुश होऊ नकोस..
पोटा पाण्याची समस्या
सर्वत्र सारखीच आहे...
तुझे धंदे,
नौकऱ्या सर्व इथेच आहे
ज्याने तुझे धंदे हिस्कावले
तो परप्रांतीय व्यापारीही इथेच आहे..
तु बांधलेस रस्ते,
रेल्वे रूळ टाकले,
खदानी खोदल्यास,
पुल बांधलेस,
अवजड कामे केलीस,
कॉंक्रीटचे शहर बांधताना तु
जीव स्वतःचा ओतलास...
रेल्वेच्या बाजुला बायको मुलासोबत
दगडी टाकनारा पैलवान
जेव्हा तु इथुन निगतोस
तेव्हा नक्कीच प्रश्न निर्माण होतो...
तुझा प्रश्न
फक्त पोट्यापाण्याचा नव्हे
विश्वासाचाही हवा
शहर सोडुन गावाकडे
जाण्याची तुझी भुमिका
सर्वकष समाज म्हणुन झालाच पाहिजे...
संचारबंदी लावुन सरकारनं
तुझ्याकडे,
अजिबात लक्ष दिलेच नाही
हा श्रमिक रिकामे बसल्यामुळे,
काही कमावू शकले नाही...
उपाशी मरण्याच्या भीतीने
निघालेत गावी
जगण्याच्या आशेने
पोटभर अन्न,
हे शहर देऊ शकले नाही...
वेदना उराशी बाळगून निघाला
कोसो मैल दूर पायीच
झालं हे अंध सरकार
तुझी व्यथा दिसत नाही...
रणरणत्या उन्हात उपाशीपोटी
डोक्यावर बोचके,
अन कडेवर लेकरू घेऊन
उघड्या रस्त्यावर माणसं दिसत आहे...
ज्यांनी उन्हातान्हात राहुन
भारताला घडवला
तो मजूरवर्ग उपासमारीने
किड्या मुंग्यासारखा मरत आहे...
मजुरांच्या सामाजिक सुरक्षेचं
वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे
पहिले कायदेमंत्री,
बाबासाहेब आंबेडकर आठवणं आवश्यक आहे...