हे माणसा जरा विचार कर
हे माणसा जरा विचार कर
एकदा घडली घटना एक
घेतले त्याने प्राण अनेक
समजेना मला आत्ता
रक्त सर्वांमध्ये असूनही एकसारखे?
विचार करतात का ते वेगवेगळे?
माणूसच माणसाचा वैरी का झाला?
त्याने असे हे भंयकर कृत्य का केले?
एवढे सगळे करुनही
त्याचा दोष देवाला का?
तो आहे मुका म्हणून
सतत त्यालाच बोलणे का?
आणला कोरोना माणसांनी
ज्यामुळे प्राण जातात लाखांनी
म्हणून त्यासाठी लढणारेही
आहेत माणसेच सारी
तरी देशा देशात इतके वैर का?
असेल मनुष्य एक
तर त्यात इतके भेदाभेद का?
प्राण घेणारेही आहेत आपलेच बंधु
व वाचवणारेही आहेत आपलेच
तर एवढे सर्व असूनही
हे मनुष्याला का समजत नाही
यावर आहे गरजेचे करणे विचार
म्हणूनच म्हणतो हे माणसा
जरा विचार कर!!!