"हे जिवन म्हणजे एक सारीपाट"
"हे जिवन म्हणजे एक सारीपाट"


हे जिवन म्हणजे सारीपाटाचा खेळ रे,
जो कौशल्याने खेळला तो जिंकला.
सारीपाटातलं प्यादे आपण खेळाचे कौशल्य घ्यावे समजावून.
शर्यतीतील घोडं सारं अडीच घराची चालं विसरली.
नियमानुसार उंटाचीही तिरकी चालही नियमभंग पावली.
आपणच पुढे जाऊ राजालाही शह देऊ हि भुमिका मनामध्ये डोकावली.
स्वार्थाच्या या मनोवृत्तीने माणूसकीही लोप पावली..
इथे फक्त स्वार्थाची नांदी येड्या गबाळ्याचे काम नाही.
&
nbsp; तुम्ही आम्ही फक्त आधलेमधले सोंगट्यागत शिपाई.
जिवनाचा हा सारीपाट विधात्याने असे जरी मांडला.
सोंगट्याचा रूपी आयूष्याचा पसारा आपल्यावर सोपविला.
आवरता आवरता हि न संपणारा.परत गुंतागुंत वाढविणारा.
खेळ संपतो एक सोंगटीच्या साह्याने राजालाही शह मिळतो.
शेजारचा वजीर खेळाचे सगळे श्रेय स्वतःहाकडे घेतो.
अगदी तांदळातल्या खड्यागत सोंगटीला अलगद बाजूला सरकवतो. अगदी अलगद !...