हा सूर्य हा जयद्रथ...!
हा सूर्य हा जयद्रथ...!
1 min
7.8K
हा सूर्य हा जयद्रथ...!
वेळ कधी कधी
अशी विचित्र येते
पार अब्रूचे
धिंडवडे काढते
चार चौघात
हसे चांगलेच करते
गालबोट इज्जतीला
जाता जाता लावते
वाईट वाटते मनास
यातना होतात तनास
मजा वाटते जनास
फुका होतो प्रयास
पण वेळ येता चांगली
हा सूर्य हा जयद्रथ दावाते
हसणाऱ्यांचे अन डाग लावणाऱ्यांचे
दात ती लीलया पाडते.....!