गवळण
गवळण
1 min
260
सांगते तुला कृष्ण मुरारी
नको आज वाट अडवू माझी
नाही तर बघ आम्ही साऱ्या
मोडू खोडी अशी तुझी....
बाजारी जाण्यास
उशीर मज झाला
बघ हा दिस कसा
डोईवर हा आला....
कोऱ्या मडक्यात
दूध, तूप, लोणी
खडा मारुनी कोरा
फोडते का सांग कोणी ?...
लगबग माझी तुला
सांगू ती कशी रे
जीवा अर्ध्या रस्त्यात
तरी पाऊल थबकले रे....
हवे तुला ते मी
देईल पुन्हा रे
आज नको अडवू
आता तू जाऊ दे रे....
तुझ्याजवळ मन
नेहमीच गुंतलेले
पण संसाराची कोडी
कोणास बरे उलगडले ?....
