STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

4  

Sakharam Aachrekar

Others

गुरूऋण

गुरूऋण

1 min
93

पावन चरणी आज तुमच्या शब्दपुष्पांजली वाहतो


धरावी कास सदा सत्याची, तुम्ही हे बीज मनी रुजविले

हाती घेता कर आपला, मज एका क्षणी गगन गवसले

पाषाणरुपी हे माझे लोहमन, सुवर्ण होऊन हर्षिले

ज्ञानरूपी परीस होऊन आपण, जेव्हा मजला स्पर्शिले

अर्पून आपणा हृदयफुले, मी चरण आपले वंदितो

पावन चरणी आज तुमच्या शब्दपुष्पांजली वाहतो


प्रकाश दाऊन केला दूर, आयुष्यातला अंधार

ज्ञानदीप होऊन या मनी उमटवला, ज्ञानाचा गंधार

विरले तुमच्या तेजात मनीचे, षडरिपू अन अहंकार

आशिर्वादे होईल आपल्या जीवनी, नंदनवन साकार

गदगद् होऊन प्रेमस्वरांनी, गुरुगान गातो

पावन चरणी आज तुमच्या शब्दपुष्पांजली वाहतो               


Rate this content
Log in