गुरू वसतो चराचरात
गुरू वसतो चराचरात
1 min
273
कधी पडले, कधी अडखळले
जीवनाची गणितं सोडवताना
कितीदा चुकले, आई
तुझ्यातल्या गुरूने वेळोवेळी सावरले
वळणावर जाताना कधी ठेच लागली
कधी मी हिरमुसली,बाबा
तुमच्यातल्या गुरूने नेहमीच कणखर बनवले
अंधारात हरवलेली मी चौफेर वाटा
पण माझी वाट अनोळखी
शाळा, तुझ्यातल्या गुरूने प्रगतीची दिशा दिली
कधी झाले उदास, कधी दाटून आला एकांत
पुस्तकरूपी गुरूने शिकवला जगण्याचा सार
भेटला प्रत्येक माणूस नव्याने
देत गेला
काही चांगले काही वाईट
घडत गेली मी अनुभव नावाच्या गुरूने
नव्याने चराचरात वसलाय माझा गुरू
थोडं ऊन थोडा पाऊस
यातून आयुष्याचे धडे गिरवत राहू.
