गुलामी ..........
गुलामी ..........
कसं हसावं त्या पाखराने
पिंजऱ्यात बंद राहून
घ्यावी भरारी उंच आकाशी
पिंजऱ्यातच नाईलाजाने
आणि लोकांनी विचारावं
तू उडत का नाही
लोकांनीच ठरवावी जिंदगी
आणि त्यांच्याप्रमाणेच
हसावं बोलावं वागावं
त्या मजबूर पाखराने
आणि राहावं कोंबून
निशब्द त्या चारदिवारीत
केली असावी थट्टा नशिबाने
आला असावा पिंजऱ्यात
आणि भेटली असावी त्याला
ती माणसं सतत छळणारी
आणि बघत असावा तोही
तमाशा त्या जिंदगीचा
पोशिंदे म्हणवणारे सारेच
पसार झालेत कुलूप लावून
आणि हळूहळू ध्वस्त झाले
त्याचेही हरेक प्रयत्न
आणि त्यानेही केली मंजूर
गुलामी त्या पिंजऱ्याची