STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

3  

Varsha Chopdar

Others

गुलामगिरी

गुलामगिरी

1 min
15.1K


सावित्रीबाईंनी केला

श्रीगणेशा स्त्री शिक्षणाचा

हालअपेष्टा सहन करत

संकल्प केला एकत्र आणण्याचा


स्त्री -पुरुष समानतेचा

डंका वाजू लागला

विविध योजना आखून

स्त्रीचा आदर होऊ लागला


तू सक्षम, तू सबला

असे सांगून सांगून

गुलामगिरी च्या पाशात

ठेवलयं जखडून


स्त्रीला ठेवलयं बांधून

नियमांच्या विळख्यात

बसवलयं नेऊन

नराधमांच्या घोळक्यात


संरक्षणाच्या नावाखाली

आपलीच माणसं घेऊन बळी

बंदिस्त करत आहेत

सगळीकडे जळी-तळी


माणसाचं मन असलेली

माणसे हवीच

गुलामगिरीचे पाश तोडणारी

माणुसकी हवीच


Rate this content
Log in