गुलाब पुष्पाची खंत
गुलाब पुष्पाची खंत
त्या रस्त्यावर विखुरलेल्या
गुलाब पुष्प ची
एकच तर खंत होती
जाणाऱ्या येणाऱ्या ची
निर्दयी पावले
त्याला जाता येता
तुडवत होती
त्याच्या मालकाने
किती प्रेमाने
त्याला बगिच्यात
जोपासला होता
खत पाणी आणि
प्रेमाचे सिंचन
जोमाने तो
बहरला होता
चढ्या भावाने एक दिवस
तो बाजारात विकला गेला
एका मंत्र्याच्या पुष्पहारात
अलगदपणे गुंफला गेला
त्याला वाटले आता तो
झालय कितीतरी महान
ज्याच्या गळ्यात तो पडलाय
लोक उचलतात त्याची वहाण
स्वतःच्याच नशीबावर करीत होता तो नाच
मंत्र्यांच्या गळ्यात असल्याने
चढला होता त्याला माज
पण हाय रे नशिबा तेवढ्यात मंत्र्यांनी त्याला गळ्यातून काढून पब्लिकमध्ये फेकला
पाकळी पाकळी विखरून त्याची
तो लोकांच्या पायदळी पडला
मातीतुन आला होता
शेवटी मातीतच पडला
असा तो फुलांचा राजा
धाय मोकलून रडला