STORYMIRROR

Sanjay Jadhav

Others

3  

Sanjay Jadhav

Others

गुढी उभारू मांगल्याची

गुढी उभारू मांगल्याची

1 min
207

नव वर्षाचे करू

स्वागत,चैत्र मास असे

मराठी नव वर्ष

बहारदार फार दिसे


गुढी उभारू सारे

आनंदाने दिंडीत यारे

नटून सजून रे

स्वागत करा नाचा गारे


महान आमुचा सण

येई आनंदाला उधाण

वसंताची ही शान

कोकीळेचे मंजुळ गाण


नवपल्लवांनी ही

नटली सृष्टी सारी,दिसे

वसुंधरा वेगळी

मनोमनी आनंद वसे


तोरण बांधू यारे 

सडा रांगोळी दारी काढू

आनंदाची उभारू

गुढी, नैवेद्य ताट वाढू


गुळाची पुरणपोळी

गुढीस करू या अर्पण 

आनंदाने भोजन

करू या साजरा हा सण 


Rate this content
Log in