गुढी अशी दारी (सहाक्षरी)
गुढी अशी दारी (सहाक्षरी)
1 min
191
भुकेले जेवण
पोटभर पाणी
तृप्तता चेहरी
गुढी अशी दारी ॥१॥
वंचितांना न्याय
समतेच्या वाटी
प्रत्येका शिक्षण
गुढी अशी दारी ॥२॥
मानव म्हणून
सुखाची गीनती
रक्षण सर्वांना
गुढी अशी दारी ॥३॥
संपेल निराशा
किरणे आशेची
नव्या पहाटेची
गुढी अशी दारी ॥४॥
मंगल सर्वांचे
मने साफ व्हावी
मंगल या क्षणी
गुढी अशी दारी ॥५॥
