गती कालचक्राची
गती कालचक्राची
1 min
529
चंद्र सूर्य रोज उगवती
दिसामागून दिस सरती
दिवस - रात्र अखंड गती
कालचक्र तयास म्हणती
सहा ऋतूंचे सहा सोहळे
क्रम त्यांचे नित्य ठरलेले
उन्हाळा हिवाळा पावसाळा
कालचक्र नेमे चाललेले
गती त्यांची निसर्ग नियमे
मानव बदल करु न जाणे
चक्रे अशी अखंड फिरणे
कालचक्र तयास म्हणणे
ऋतूचक्र नेमस्त गतीने
वसुंधरा हरित रहाते
मानव जीवन सुखी होते
कालचक्राच्या गतीसामर्थ्ये
कितीही श्रेष्ठ होवो मानव
कालचक्र अशक्य रोखणे
कालचक्राची गती चालणे
परमेशाला नित्य वंदणे
