Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dnyaneshwar Bhoyar

Others

4  

Dnyaneshwar Bhoyar

Others

ग्रीष्मातील मैफिल

ग्रीष्मातील मैफिल

1 min
21.2K


ग्रीष्मात फुलला पळस फुलोरा

लालकेशरी रंगाचा पिसारा

नटली धरणी शाल ओढुनी

शितल कराया रंगात रंगूनी ||१||

तानभूक पाखरांना लागली

दिनकराच्या अग्नीत हरपली

चातकाला मग ओढ लागली

मेघधारांची वाट पाहिली ||२||

रात्र चांदणी नभी चमकता

तारे सकळ संपेना मोजता

चंदामामा अन चांदणी ताई

जयांना कथेतून शिकवन देई ||३||

भर दुपारी मग खेळ रंगतो

खेळता चौरस वेळही निघतो

गप्पांच्या गावी मैफिलीत असते

बोबडे बोल कल्पनेत रमते ||४||

चिंच फुले, कैरी खाता

स्वाद मीटवी दाहकता

मामाच्या गावी मजेत राहून

सुट्टीही जाईल अशीच संपून ||५||....


Rate this content
Log in