गरीबी
गरीबी
1 min
111
नाही धान्य घरी कशी
टाकू चुलीवरती मग भाकर
महागली आता आणू
कशी चहासाठी साखर
पै- पैशाची चिंता
करतो घरचा धनी
लेकरांच्या काळजीने रात्री
नाही लागत बाईची पापणी
येतो कधी दुरून कधी
पंचपक्वान्नाचा वास
पण आपले म्हणुनी नाही
इथे कुणी आसपास
शहरात या बंगला, गाडी
माणसांचीच सारीकडे गर्दी
कधी धाक दाखवते त्या
पोलिसाची खाकी वर्दी
नाय हाताले आज काम
वाढते पोटातली भुकेची आग
अंधारात गांधारी दिसते
जेव्हा येते मले सकाळी जाग
