गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर
जगताना मरण्याचा मार्ग बेहत्तर झाला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला .....!!
मात, विटा, डबरचा भाव असा वाढला
वाळू, सिमेंट, चुनाही अचानक भडकला
घर बांधण्याच्या स्वप्नाचा चक्का चुर झाला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला ..!!१!!
पेट्रोल अन् डिझेल तर शतकाच्या वर गेला
घरगुती गॅस ने हजारांचा टप्पा पार केला
वाढत्या महागाईचा येथे भडकाच उडाला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला....!!२!!
भाव नाही मिळत सडून पडतो माल
मधल्यामध्ये पैसे खातो फुकटचा दलाल
पोशिंद्याचा कोणी वाली नाही उरला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला....!!३!!
टोमॅटो अन् कांदा शेतामध्ये सडला
अवकाळी पावसाने शेतकरी रडला
फास लावून घ्यायचा मार्ग त्याने पत्करला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला....!!४!!
कोरोनाने बघा केला कसा कहर
वादळीवाऱ्यात कित्येकजण झाले बेघर
गरीब लाचार होऊन उपाशी मेला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला....!!५!!
दोन वर्षात महागाईने कळस गाठला
लॉकडाऊनमुळे जगाचा गाडा थांबला
पैसे येण्याचा मार्गच बंद केला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला...!६!!
महागाई म्हणे कोरोनाला तु का मध्ये आला
तो म्हणे महागाईला माझ्या मुळे तुझा पारा चढला.
दोघांच्यात गरीब बिचारा विचाराने ग्रासला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला..!!७!!
जगताना मरण्याचा मार्ग बेहत्तर झाला
गरिबांच्या जगण्याचा मार्ग खडतर झाला ....!!
