Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

ग्रामीण संस्कृती

ग्रामीण संस्कृती

1 min
245


किती वर्णू बाई , माझ्या गावाची संस्कृती !!

शिकविते मोल मला , भान एकोप्याचे किती!!   (1)


देवभोळे मन तिचे , जात्यावरी गाई ओवी

गाता गाता घरादारा , कितीतरी गं शिकवी.        (2)


नित्य झाडून अंगण , नित सडा ती घालते        

रांगोळीच्या नक्षीमधे , हळदीकुंकूही रेखिते.   (3)


शूचिर्भूत होऊनिया , अन्नपूर्णा कामा लागे

समाधानी मनानेच , लक्ष्मी स्वयंपाक रांधे     (4)


वर्षाचे बारा सण , आनंदाने हो साजरे

पुरणाच्या नैवेद्याने , कुलदेवतेस स्मरे.           (5)


जोडी खिल्लारी बैलांची , वर्षभरी गं राबते

पोळी पुरणाची त्यांना , प्रेमभरे भरविते          (6)


आला गेला शेजारीही , ओल्या मायेने सांभाळी

तृप्त करोनी सर्वांना , नाती प्रेमाने जोडली     (7)


कर्त्या पुरुषाचा ठेवी , मान नेहमी आदरे

मानपान सांभाळून , जोडी सोयरे धायरे       (8)


घर असे ते प्रेमळ , बूज राखते नात्यांची

नित्य दिवेलागणीला , सांजवात लक्ष्मीची         (9)


अशी मायेची प्रेमाची , माझ्या गावाची संस्कृती

जपते मी प्रेमभरे , ठेव माझी आयुष्याची        (10)


Rate this content
Log in