गोवा अमुचा सुंदर सुंदर
गोवा अमुचा सुंदर सुंदर
1 min
415
गोवा अमुचा सुंदर सुंदर
निसर्ग इथला रम्य मनोहर
पर्यटकांना भुलवणारे समुद्रकिनारे
आणि किनाऱ्यावरील खारे वारे
सागर किनाऱ्यावरचे मच्छीमार कोळी
रिकामी नसते कधीच त्यांची झोळी
नद्या नाले पर्वत आणि डोंगर
नजरेला भरते हिरवेगार कुळागर
डोंगरांवर ॠतुप्रमाणे रानमेवा
कुणीही करायला लागेल हेवा
इथली झाडी हिरवीगार
पानाफुलांना येतो बहर
शेतकऱ्यांची शेती आणि कामे रानीवनीं
गरीब असतील खरे पण सुखी समाधानी
नारळाची झाडे वाढतात ऊंच ऊंच
सुपाऱ्यांचा खालीं पडतो खच
काजू जांभळं फणस नारळ
कोकमचे काढतात लाल आगळ
गोव्याला लाभलेत उच्च कलाकार
होऊ दे देवा त्यांचे स्वप्न साकार
