STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Classics Inspirational

3  

Bhagyashri Chavan Patil

Classics Inspirational

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

1 min
1.1K

टाळ मृदुंगाच्या गजरात बाप्पा आम्ही तुझे स्वागत करतो...!!

आम्ही भक्तगण गुणगान तुझ्या नावाचे ही सारे जण गातो ...!!


तुझी सुबक मूर्ती भरू दे या माझ्या नयनी अशीच कृपादृष्टी होई..!!

कारण तू येता प्रत्येक घरी मन हे अगदी प्रसन्न होई..!!


लहानग्यांचा सखा अन् मोठ्यांचा पाठीराखा बनतो...!!

न सांगता मनी असलेल्या सार्‍या इच्छा पूर्ण तू करतो...!!


बाप्पा तू येण्याने माणूस धर्माला पण विसरतो...!!

अन् एकत्र तुझ्या नटखट रूपाचे सगळेजण स्वागत करतो...!!


तुझे हक्काचे अकरा दिवस अगदी दिवाळीसारखे साजरे करतो...!!

तुला काय हवे-नको या दिवसात आम्ही सर्व भक्तीभावाने पाहतो...!!


बाप्पा तू जाताना मात्र डोळे पाणी भरून जातात...!!

लक्ष सगळे तुझ्याकडे असते परत मागचे दिवस आनंदाने आठवतात..!!


पुढच्या वर्षी लवकर या ही साद ऐकताच मागे वळून हसूनी पाहतो..!!

असा माझा बाप्पा ढोलांच्या ताशांच्या गजरात आपल्या घरी निघूनी जातो...!!


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Classics