गंधाळली गंधवती ( अष्टाक्षरी )
गंधाळली गंधवती ( अष्टाक्षरी )




रमे मन विहारात
धम्म गोडी श्रावणात
वर्षावास आषाढात
हिरवळ श्रावणात ॥ १ ॥
धम्मदेसनेला येती
शुभ्र वस्त्र परिधान
ऊन सावलीत डोले
बोधिवृक्ष बोधीपान ॥ २ ॥
त्रिसरण पंचशीला
गुंजतेय समूहात
हर्ष होई निसर्गाला
फुल वेली सुगंधात ॥ ३ ॥
बुद्ध धम्म संघ दिसे
चातुर्मास सांगतेत
गंधाळली गंधवती
पक्षी गाती अंगणात ॥ ४ ॥