STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

गंध मैत्रीचा

गंध मैत्रीचा

1 min
462

आठवणींच्या मेळाव्यात

सहजच फेरफटका मारला

नातीगोती सांभाळताना

मैत्रीतला गंधच हरवला...


माणसं सर्वच जवळ केली

त्यांच्या सान्निध्यात सुखावले

कुटुंबालाही छान जपले

मैत्रीतले हिरे जरा दुरावले...


अंतर मैत्रीतले जरा वाढत गेले

पण प्रेम मात्र तसेच राहिले

बोलणे जरी होत नसले तरी

बंध मैत्रीचे नाही हं तुटले...


रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त

ओढ असते निखळ नात्याची

गोडी असते मैत्रीत रमण्याची

संसारात असूनही आस मात्र मैत्रीची...


गंध मैत्रीचा खरेच असतो का?

अहो मैत्रीचा छंद मात्र असावा

हा छंद सार्‍यांनीच जोपासावा

मन अंतरी मैत्रीचा ठेवा जपावा...


Rate this content
Log in