STORYMIRROR

Priti Dabade

Others Children

4  

Priti Dabade

Others Children

गमतीजमती

गमतीजमती

1 min
189

असायचा तास

चालू तरीही

गप्पा काही

संपत नाही


मधल्या सुट्टीची 

पाहायचो वाट

डबे खाण्याचा

वेगळाच थाट


वेळेचे नसायचे 

आम्हाला भान

सुरपाट्या, खोखोत

व्हायचो मग्न


चिंचा, बोरं

लागायची गोड

सोबत असायची

पेरूची फोड


व्हायची आमच्यात

चुरशीची लढत

केस धरून 

बसायचो ओढत


परीक्षा असता

दडपण यायचे

हळूच इशाऱ्याने

उत्तर खुणवायचे


शाळेत असायची

वेगळीच मजा

शाळा बुडणे

वाटायची सजा



Rate this content
Log in