STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

गळून गेले माझे मी पण

गळून गेले माझे मी पण

1 min
6.2K


गळून गेले माझे मी पण

अनुभूतीला सारे अर्पण ।।


जरी म्हतारा मी बीन कामी

येईल आठवण क्षणोक्षणी ।।


दरात सजवती मांडव भारी

मला बसवती मंदिरा वरी ।।


सारे झाले स्वार्थी मतलबी

कामा पुरती गोडी गुलाबी ।।


तोंडा पुरती करता हळहळ

चालायचा तो चालतो छळ ।।


घरात पाहीजे हसरे चहरे

मायबाप म्हणे आश्रमातबरे ।।


वृद्ध बिचारे देती शाप

फेडावे लागेल तुम्हा पाप ।।


माणवा हीच तुझी करणी

करावी लागेल तुला भरणी ।।


गळून जाईल तुझे मी पण

तुला होईन त्यांची आठवण ।।


Rate this content
Log in