STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

गजरा

गजरा

1 min
503

बकुळीच्या या छायेत

मायेचा बहर आला

आईच्या आठवणीचा

गजरा मनी माळला||१||


पाहता ही फुले मज

स्मरण तुझेच होते

नयनातील पाण्याने

मन भिजून फुलते||२||


सदैव फुलात भासे

मजला तुझे अस्तित्व

अंगणात वृंदावनी

रोजच मिळे ममत्व||३||


रम्य समयी सकाळी

कोकिळा ही गाणे गाई

सूर तव कानी येता

मला उठवून जाई||४||


दिवस सरता तुझी

नजर मलाच पाही

गजऱ्याचा दरवळ

हृदयी भरून राही||५||


Rate this content
Log in