गजर विठुमाऊलीचा
गजर विठुमाऊलीचा
1 min
2.5K
पंढरीच्या वाटेवरी
चालले भक्त
गजर विठूमाऊलीच्या
दुमदुमला आसमंत
भक्तीचा पथमार्ग
तुडविला अनवाणी
रानिया सकळा विठोबाची
आस लागली मनी
दर्शनाच्या आशेने
मज न उरले भान
एकमुखी विठोबाध्यान
मन झाले उन्मन
दारी येऊन ठ।कीला
मन तृप्त होईल तेव्हा
डोलेभरून दर्शन घेईल
साक्षात्कार तुझा होता
माझा मोक्ष होईल
