STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

गझल

गझल

1 min
367



आज पाठी वार केला कोण होता ज्ञात नाही

देशद्रोही आपलाची पण मला माहीत नाही.......!!


लोभ माझा वाढला केली उठापटक दुनियेची

जीवनामधले अमर हे क्षण मला माहीत नाही....!!


सोसल्या मी नीयतीच्या दग्ध झळा प्रेमातल्या का?

आठवां ह्रदयात सळतो व्रण मला माहीत नाही....!!


घातक्यांनी घात केला सुंदरपणा शाप ठरला

दानवांनी का छळले या? पण मला माहीत नाही.......!!


मोल दीले कष्ट करूनी झेलले मी वादळाला

कमवलेल्या या धनाचा कण मला माहीत नाही....!!


माय माझी ही मराठी आसमंती तव भरारी

आज गाती सार्थ गाथा पण मला माहीत नाही....!!


हरकुनी ही रोगराई आलिया आघात करण्या

घास अडतो हा घश्याला पण मला माहीत नाही....!!


Rate this content
Log in