STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

गझल

गझल

1 min
576


बागेतल्या फुलांना हळुवार तोडताना

काटेच लागले मज केसात माळताना।।


मी दुःख जीवनाचे सांगू किती कुणाला

सारी हयात गेली दुःखात सोसताना।।


परडीतल्या फुलांना केसात सजवते मी

कांटेच का रुतावे हारात ओवतांना।।


सांगू कशी कुणाला प्रेमात वायदा हा

सारी उमेद सरली वाऱ्यात वाहतांना।।


राखून ठेवली मी मजलाच अंतराती

आपूलकी पळाली नादात चालतांना।।


रात्रीस चांदण्याचा स्वानंद घेत होता

लाचार केवढा तो काट्यात चालतांना


ह्रदयात वेदनांना आली मिजास होती

भांडायचे कश्याला कार्यात राबतांना।।


गोतावळ्यात होता लाचार तेज माझे

ही समर्थ मार होती नात्यात वागतांना।।


कार्यात सार आले संवेदना मिळाली

धावून मार्ग आले या मार्गात चालतांना।।


भेटून सर्वस्व काही जीवा करी दहन ही

नशिबास दोष देती साऱ्यात राहतांना।।


नाकारले कसे हे मत समजलेच नाही

लाचार केवढा तो वादात भारतांना।।



Rate this content
Log in