STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

गजानन महाराज आरती

गजानन महाराज आरती

1 min
168

जयदेवा जयदेवा, जय गजानना

आरती ओवाळू, ह्या परब्रम्हांना // धृ //


अचानक जगी , तू प्रगटलासी

शेगाव ग्रामासी , भोजन सेविसी

काय वर्णावे मी , तुझिया लीलांना  (1)


कुत्सितांनी तुज , दूषण दिधले

परि सामर्थ्याने , तू सत्य दाविले

भक्तांच्या हाकेला , धावूनिया ये ना   (2)


अगाध महिमा , अपार शक्तीचा

विद्यावाचस्पती , मुखोदगत वाचा

वरदान लाभे , त्या श्रद्धावंतांना (3)


Rate this content
Log in