घुसमट
घुसमट
जन्म झाला आज इथे अंधार नितीचा |
भरकटलेल्या विचारांचा आणि पीडीत जातीचा||
संघर्षाच्या लढाईत पार सापळा झाला हो माणसाचा |
फक्त इथे खेळ चालतो भ्रष्ट नितीचा आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा ||
अहो भुकेनं व्याकुळ झालेले लेकरं
जन्म देणाऱ्याला हि पापी म्हणतात
बंद पिंजऱ्या आड कोंडलेले पाखरं
पंख फडफडण्यास तरसतात
तसेचं ह्या स्थितीचा अंदाज घेत
माझ्या आतल्या वेदना सांगतात
जागव तुझ्यात स्मशान, पेटव ह्या अंधार नितीला
आणि दाखव ह्या जगाला,तुझ्यातला तिक्ष्ण प्रतिकार
इथे चालतोस कसा हो अनितीचा डाव
जिथे हत्यारांचा जेव्हडा घाव पोहचत नाही
तेव्हडा वार हे जगण्याशी करून जातात
घुसमट होते हो ह्या कुनितीच्या असुरांन पायी
जगणं लय अवघड झालंय,पण धाडस मात्र सोडायचं नाय
मनगटात जोर आहे तोवर,निर्माण करायचं बळ
आणि एकदाच ठार करायचं ह्या अंधार नितीला
जगण्याच्या शर्यतीत कधी घुसमट होणार नाही
हा माझा प्रतिकार आहे...!