गहन प्रश्न
गहन प्रश्न
1 min
378
देशापुढे प्रश्न आज
यक्ष बनून उभे ठाकले
बेरोजगारी सगळीकडे
महागाईने कंबरडे मोडले
पेट्रोल नि डिझेलचे भाव
गगनाला भिडती
प्रचंड महापुराने
गावे बुडती
पिकाला नाही
योग्य भाव
लहरी पाऊस
घाली काळजावर घाव
प्रदूषणाचा प्रश्न
आहे फार गहन
जागे व्हा आताच
त्रास होणार नाही सहन
प्रश्न आहे आजच्या काळात
सर्वांच्या ऐक्याचा
प्रश्न आहे आज जगात
माणसाच्या माणुसकीचा
सोडवूया प्रश्न
सारे मिळुनी
देऊ उत्तर
सक्षम होऊनी
