STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

3  

Jyoti gosavi

Tragedy

घाव

घाव

1 min
29


घाव

काळ्या तापलेल्या मातीत

 कोंदाटला तिचा श्वास

 डोळे लागले आभाळाकडे 

लागली मिरगाची आस

 गेल्या वर्षालाआला नाही

धन्याने सोडला श्वास

कर्जाचा या ओझ्या पायी

धन्याने घेतलाया फास

कपाळीच कुंकू गेलं

डोईवर छप्पर नाय

घरात एक दाणा नाय

आता पिलाच्या मुखी

 घालू काय

अरे अरे सरकारा

आता तरी जागा होय

तू दिलेला र पैका

माझ्या पवतर आलाच नाय

 तू दिलेला र पैका

मधल्या मधीच जिरला

फुटल माझं नशीब

सारा काळच फिरला

अरे माझ्या मेघराजा

या वर्साला तरी पाव

डोळ्यात आस उद्याची

परी काळजात घाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy