Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

गौराईच्या बाळा

गौराईच्या बाळा

1 min
92

गणपती बाप्पा मोऽऽरया, मंगलमूर्ती मोऽऽरया

ढोल व ताशांचा गजर हा झाला, 

गणपती आज, मिरवत आला||धृ||

गौराईच्या बाळा, नाचवत वाळा,

गळ्यामध्ये तुझ्या या दुर्वांच्या माळा,

तुतारी वाजवू, गुलाल उधाळा,

आतिशबाजीचा कोट हा उडाला||१|| 

जयघोष केला, आभाळा भिडला,

मखरी बसला, हारांनी सजला,

मोदक फळांचा, प्रसाद मांडला,

पंचपक्वान्नांचे ताट भोजनाला||२||

लहान थोरांचा, नाचण्या-गाण्याचा, 

दिन आनंदाचा, अन जल्लोषाचा,

उंदीर मामाही, येई गणेशाचा,

उधाण आलंय, आज उत्साहाला||३||

महामारी कशी, जीवघेणी झाली,

वेळ सा-यांवर, संकटाची आली,

देवा कृपा कर, तार या जीवाला,

गालबोट नको लागू दे सणाला||४||

Rate this content
Log in