गावी चांदण्यांच्या
गावी चांदण्यांच्या
1 min
234
चांदण्यांच्या गावी तुझ्या
बांधूया स्वप्नातला बंगला
भव्य खिडक्यादारे असती
आकाशाच्या अंगणी टांगला
वाऱ्याच्या थंडगार झोतांनी
शहारून जाईल माझे अंग
दरवळ सुटताच फुलांचा
मिलनात होऊ दोघेही दंग
मिठीत कायेचा होता कंप
मोहरून कवेत मी शिरेन
तुझ्या प्रीतीच्या पाकळ्या
वेचता माझी मी न उरेन
ओढ मिलनाची लागता
नदी वाहिली सागराकडे
खळाळता प्रवाह भेटीचा
पार करते दऱ्या डोंगरकडे
ओळखीची खूण ही पटली
सखी ती सख्याशी एकरूप
धूंद अलवार होई ती मिठीत
आलिंगन प्रेमाने मिळते खूप