गाव ते गाव असतं
गाव ते गाव असतं
1 min
613
गाव ते गाव असतं
तिथ माझ तुझ अस
काहीच नसत
चार खनाच का होईना
कौलारू टुमदार घर असत
दार सताड उघडी अन
येण जाण सार्यांच असत
गाव ते गाव असतं
चुलीवरल्या भाकरीसोबत
ठेचा तोंडी लावणे असतं
मायेची दूधावरली साय अन
उडदाच उकळत माडग असत
गाव ते गाव असतं
शेजारधर्माला जागण आणि
मनमोकळ वागण असतं
बोलाचालायला इथ कुणाचेही
कसलच बंधन नसतं
गाव ते गाव असतं
मोकळी हवा मोकळे मन
वागणं ही सार्यांच मोकळे असतं
माया ममतेचा घडा भरलेला
अन अंतःकरण सरळ असत
गाव ते गाव असतं
गाव ते गाव असतं...
