गाथा
गाथा
1 min
195
तुकोबाची ऐकता गाथा
वाटे टेकवावा माथा
धर्माचे मारेकरी खातात
सुज्ञ जनतेच्या लाथा.
तुका जरी मारीला
त्याचे कार्य अमर
धर्माचे गारदी कोण
माहिती सांगे नगर.
जीवाचा मैतर असता
गाथा पुन्हा अवतरते
तुटलेल्या फांदीला जणू
पालवी पुन्हा फुटते.
अशी कथा युगांची
विचार गाडून टाकण्याची
चिरडली तरी पुन्हा
नव्या जोमाने वाढण्याची.
तलवारीच्या पात्याने कधी
विचार मरत नसतात
गवताच्या पात्या सारखे
असंख्य मनात रुजत असतात.
तुकोबाची गाथा ठरते
गाथा नव्या विचारांची
बोलण्या प्रमाणे वागणे
सांगणाऱ्या आचारां ची
