STORYMIRROR

Pandit Warade

Others

5.0  

Pandit Warade

Others

गांव माझा

गांव माझा

1 min
540


   गांव माझा

डोंगराच्या पायथ्याशी गांव माझा

मांडला मी जीवनाचा डाव माझा.


गाळतो मी घाम तेथे खूप सारा

पाहता का काय तेव्हा आव माझा.


माल बाजारात जेव्हा आणतो मी

सांगताही येत नाही भाव माझा.


पाहिला का आज आखाड्यात कोणी

रंगलेला झिंगलेला गांव माझा.


श्वास घेण्या प्राणवायू पाहिजे तर

ऐक सल्ला हाच 'झाडे लाव' माझा.


लाभले रे प्रेम जेथे खास तुजला

पंडिता‍‌‌‍ तू आठवावा गांव माझा.



साहित्याला गुण द्या
लॉग इन