ऍसिड
ऍसिड
1 min
252
कुणावर प्रेम करणे
चुकीचं का ठरते
ज्याच्यावर करत नाही
त्यालाच का नडते
होकाराला उत्तर नाही
नकार तरी दिला
का तिचा नाश करून
चेहरा खराब केला
काय गुन्हा असावा
ओळख मिटवू पाहतो
अपराध करणाऱ्या हाती
कुठे प्रेम शिल्लक राहतो
तिच्या वेदनांचा हाहाकार
कोण सोसणार आहे
हिंमतीचा धरून हात
आरसाच होणार आहे
