Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

एकी

एकी

1 min
32


एकदा काय झालं फुटली भांड्यांना वाचा

फुटली भांड्यांना वाचा !

भांडत बसले आपसात सारे कचा कचा !


चहाचं पातेलं तरातरा पुढे आलं म्हणतं काय ?

माझ्या शिवाय यांचा दिवस ऊगवत न्हाय !

सुर्याच्या आधी माझं दर्शन घेतात

तेव्हा कुठे ताजे तवाने होतात !


गाळणं म्हणालं गाळणं म्हणालं

फुगू नको उगी फुगू नको 

खोटेनाटे काही सांगू नको

गाळल्याशिवाय काय ते चहा पितात ?

माझ्या कडुनच गाळुन घेतात !


नाचत नाचत आला चिमटा

म्हणतो कसा ? 

माझ्यशिवाय कसे चहा घेतील?

मी नसलो तर त्यांचे हातच पोळतील !


तेवढ्यात आले बाबा म्हणाले थांबा रे थांबा !

बेट्यांनो तुम्ही असे भांडतात काय ?

चहा, साखर, पाणी 

दूध शेगडी राणी

पातेलं, चिमटा नी गाळणी

कपबशीचाही रुबाब असतो मोठा !

एकीने काम तुम्ही करता सारे

तेव्हा कुठे आम्ही चहा पितो रे !


भांडू नका ! तंडू नका एकीने रहा !

एकमेकांच्या नेहमी जवळ रहा !

पाजा छान छान चहा

लोक करतील सदा तुमचीच वाहवा !


Rate this content
Log in