एकच...
एकच...
1 min
104
एकच चोरटा कटाक्ष
त्याचे अंतरंग खुलवितो
यौवन उर्मींना त्याच्या
पूनव बहर येतो
एकच नजरभेट
प्रीतीमोहोळ निर्मिते
मनातले सारे काही
सहज सांगून जाते
एकच प्रियाचा होकार
तिची सुखस्वप्ने साकार
मेंदीच्या ओल्या हाताला
सुखद प्रेमळ आधार
एकच तिचे सुहास्य
त्याचे मन उमलवी
प्रेमाची रंगीत कारंजी
थुईथुई नाचवी
अनेक "एकच" जीवनी येती
उभयता सहजचि उपभोगिती
वाळुपरि हातातून निसटती
झडकरि मनःकुपीत टाकती
