एकच प्याला
एकच प्याला
1 min
66
एकच प्याला दारुचा, नेतो की रसातळाला
किर्ती वैभव गुण, जाती अगदी लयाला
संगती संग दोषेण, तळीराम भेटे कधी
एकच प्याला चाखता, व्यसनाधीन तो होई
सतत झिंग दारुची, काया लागे खंगायला
फिका पडे उपदेशही, व्यक्तिमत्व विलयाला
समाजसुधारक थोर, नित्यचि कार्या झटती
व्यसनमुक्तीसाठी नित्य, उपाय नवे योजिति
पुनर्जन्मचि लाभे, नवजीवनी प्रवेश
लाभती जुने बंध सारे, होई जीवन तेजोमय
लाख लाख नमस्कार, आमुचे महामानवांना
झटती निरपेक्षतेने, व्यसनमुक्ती कार्याला
