STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

एकादशी

एकादशी

1 min
15.3K


आली आली विठोबाची एकादशी

राया जाऊ चला पंढरपुराशी.


पाहू सावळा विठ्ठल ,रखुमाई

आस लागे जीवा करा आता घाई.


पाहू चंद्रभागा न्हाऊ तिच्यामध्ये

जय हरी विठ्ठल गाऊ आनंदे.


विटेवरी उभा माझा पांडुरंग

कटेवरी कर सावळेच अंग.


भक्तांसाठी उभा सावळा श्रीहरी

तयासाठी करू दोघे पायी वारी.


डोळा भरुन पाहू विठूचे रूप

वारी पंढरीची मजला अप्रूप.


साहित्याला गुण द्या
लॉग इन