एक तरी मुलगी असावी...
एक तरी मुलगी असावी...


बोबडे बोल बोलणारी...
घरभर बागडणारी...
छुमछुम नाचणारी...
एक तरी मुलगी असावी...!!
परकर पोलके घालणारी...
नट्टापट्टा करणारी...
लुटुपुटचा खाऊ भरवणारी...
एक तरी मुलगी असावी...!!
ताईगिरी करणारी...
हक्काने भाऊबीज मागणारी...
जिवाभावाची सखी बनणारी...
एक तरी मुलगी असावी..!!
हळूवार कुशीत शिरणारी...
मनातले गुपित सांगणारी...
नजरेतूनच सर्व जाणणारी...
एक तरी मुलगी असावी..!!
आरशात बघून हसणारी...
मनमोहक लाजणारी...
लटकेच रुसणारी...
एक तरी मुलगी असावी..!!
साहसी नि खंबीर असणारी...
उंच भरारी घेणारी...
कुटुंबाची शान असणारी...
एक तरी मुलगी असावी..!!