एक ओष तुझ्यासाठी
एक ओष तुझ्यासाठी
1 min
140
एक ओळ तुझ्यासाठी
आई दिलेस आम्हासी
गुरु होऊनी शिक्षण
दिले बळ जगण्यासी
थोडी पुण्याई आमची
आई तुला मिळवली
आहे सुखदुःखात ही
सदा होऊनी सावली
स्वार्थी याच दुनियेत
शिकवले तू जगणे
जसे नसता पोरके
वाटे दुःखच सोसणे
जीवनात आधार तू
क्षणोक्षणी हा वाटते
बळ संकटी सामना
मन पुढे धजावते
