एक नवे पाऊल
एक नवे पाऊल

1 min

200
एक नव पाऊल टाकावे म्हणतो
जगासोबत पुढे चालावे म्हणतो
नव्या विचारांशी गट्टी करावी म्हणतो
नव्या जुन्याची सांगड घालावी म्हणतो
रोजच नवी पहाट येते नवी आव्हाने घेऊन
पाहूयात आव्हानांना जरा तोंड देवून
नव्या कल्पनांना मांडू या हक्काने जगापुढे
तेव्हा कुठे आपूले खंबीर पाऊल पडे
निधड्या छातीने जावू या सामोरे स्पर्धेला
नको यशाची चिंता प्रयत्न येतील फळाला