STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

एक दिवस

एक दिवस

1 min
371

एक दिवस बदलून पाहू या 

आपण आपली रूपं

खरच कधी होईल का

बदलणं इतकं सोपं 

आईची सहनशीलता येईल 

 का येईल समजूतदार पणा 

कितीही संकट वेदना आल्या 

येईल का तिचा ठामपणा 

बाबांची कठोर भाषा येईल 

का येईल निर्भिडपणा

काळजाला कितीही पडला पिळ

तरी नजरेत येईल का करडेपणा 

ताईची जागा झाली निश्चित 

जमेल का तिच्यातला आपलेपणा 

इतरांच्या सुखात सुखावून जाण्याचा 

जमेल का परिपक्वपणा 

लहान भाऊ असतो लाडोबा 

तरीही जमेल का मनमिळाऊपणा 

लहान लहान म्हणूनसुद्धा 

जमेल का मनाचा मोठेपणा 


Rate this content
Log in