एक दिवस मैत्रीचा
एक दिवस मैत्रीचा
1 min
227
एक दिवस अचानक
तू दारात उभा राहिलास
फोन नाही काही नाही
सरप्राइझच दिलास
छान जेवण करुन
गप्पांची मैफल सुरु
आठवणींच्या लडी
लागल्या उलगडू
जुनी शाळा , शिक्षक
सर्व काही आठवले
चेष्टा मस्करी अन्
सर्व काही आठवले
जुन्या मित्रमैत्रिणी
खट्याळ फिशपॉंडस
चिडवणे रागावणे
ह्यातच मजा खास
कधी संध्याकाळ झाली
कळलेच नाही
आठव सारे जागले
ती मजाच न्यारी
