STORYMIRROR

Mina Shelke

Others

3  

Mina Shelke

Others

एक चाल

एक चाल

1 min
29.2K


देव धरला वेठीला

डोळे नाही पाठीला

साधला बघा मोका...

झेंडा लावला डावाला...


काय म्हणावे खेळाला

लावली जीभ टाळ्याला

जनता लावली कामाला

पेटवली पुन्हा होळीला


खेळताहेत बघा डावपेच

निर्मिला भावनिक पेच

चालली अशी खेचाखेच

मागचा सावध पुढच्याला ठेच


देवाजिच्या द्वारी चाले..

मलिद्यासाठी भांडाभाड

पुन्हा घडवतील तांडव

सोडून बघा टोळधाड


तुमचे स्वार्थी राजकारण

खेळा तुमच्याच रिंगणात

आणू नका मतलब तुमचा

आमच्या भक्तीच्या अंगणात


Rate this content
Log in