द्वेष
द्वेष
1 min
318
काव्यस्पर्धेत एकदा
मी सपशेल आपटले
क्रमांक मिळणे दूरच
उत्तेजनार्थही गमावले
प्रथम क्रमांक पारितोषिक
मैत्रिणीने पटकावले
अभिनंदन करण्याऐवजी
रुसून घरी परतले
हे असे झालेच कसे?
मनात द्वेष उफाळला
तिलाच का पहिला नंबर?
माझा नंबर कसा गेला?
थोड्या वेळाने मीनल
माझ्या घरी आली
नाराज नको होऊस
मैत्री आपली भली
गोरामोरा चेहरा
तिने केला हसरा
द्वेष काढला मनातून
दिला सुगंधी गजरा
