दवबिन्दु
दवबिन्दु

1 min

28
पहाटेला
तृणावरी.
चमचम
दव करी.
अलगद
अलवार.
दवबिंदू
मृदु फार.
मोती जणू
इवलाले.
कोणी असे
सांडियले.
वारा तया
खेळवितो.
झुल्यावानी
झुलवितो.
देवाजीने
दिले देणे.
धरणीने
ल्याले लेणे.