दूर थांब
दूर थांब
1 min
90
नात्यापेक्षा कर्तव्य
श्रेष्ठ आहे ग बेटा
घरी जरी आलो
तरी अंतर ठेवून भेटा
पहिल्यासारखा तुला
नाही उचलुन घेवू शकत
सामाजिक दुरावा ठेव
कोरोना दूर दूर ठेवत
जीव माझाही तुटतो
काय सांगू तुला
तुझ्या जीवाची काळजी
दूर ठेवतोय माझ्या मुला
जातील हे ही दिवस
संयम थोडा ठेवूया
लॉकडाऊन संपू दे
आपण सोबत जेवूया
दूर थांब नको रडू
दिसतो तुझा चेहरा
हस पाहू थोडे आता
टाटा कर एकदा हसरा
